महात्मा गांधी आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त खडकवासला काँग्रेस कमिटीच्या वतीने सिंहगड रोड येथे अभिवादन

सिंहगड रोड : महात्मा गांधी आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त खडकवासला काँग्रेस कमिटीच्या वतीने सिंहगड रोड येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग नाना चव्हाण पाटील यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महात्मा गांधींचे सत्य, अहिंसा, शांतता व मानवतेचे विचार, तसेच लाल बहादूर शास्त्री यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा व राष्ट्रसेवेचा आदर्श आजही समाजाला दिशादर्शक आहे. नव्या पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचे श्रीरंग नाना चव्हाण पाटील यांनी सांगितले.

यावेळी पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद पोकळे व श्रीकृष्ण बराटे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास, पुणे शहर काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष धनंजय पाटील, ,पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय लगड,आबासाहेब पारगे, महेश शिंदे, सुहास धावडे, साहेबराव मते, आझाद तिकोटे, रघुनाथ यादव, गणेश शेडे, धनंजय पवार, नामदेव भुरूक, धनंजय पोकळे, रमाकांत भूमकर, पुरुषोत्तम नवटके आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  बाणेर बालेवाडी व राजीव गांधी आयटी पार्क मधील नागरिकांच्या समस्या बीबीपीआरएच्या कोअर कमिटी सदस्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत मांडल्या