कोथरूड मधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ; रुपाली पवार आणि अल्पना वरपे यांच्यासह वाहतूक विभागाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी

कोथरूड : कोथरूड डेपो चौक, शांतिबन चौक आणि एकलव्य कॉलेज चौक परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाकडून उपाययोजनांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका रुपाली सचिन पवार आणि नगरसेविका अल्पना वरपे यांच्या उपस्थितीत वाहतूक पोलिसांनी संबंधित चौकांची प्रत्यक्ष स्थळपाहणी केली.

या वेळी पोलीस इन्स्पेक्टर श्री. गवळी यांनी नागरिकांना सोयीस्कर ठरतील असे वाहतूक नियोजनाचे पर्याय सुचवले. या उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच गर्दीच्या वेळेत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणीही मान्य करण्यात आली.

कोथरूडमधील या प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करणे, प्रवास अधिक सुरक्षित करणे आणि वाहतुकीचे नियोजन प्रभावीपणे राबवणे, हा या उपाययोजनांचा उद्देश आहे. नागरिकांच्या सूचनांचा विचार करून वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे नगरसेविका रुपाली सचिन पवार यांनी सांगितले.

See also  आजचा अर्थसंकल्प म्हणजे युतीचे संकटकालीन रेवडी वाटप!: मुकुंद किर्दत, आप