पुणे : औंध क्षेत्रीय कार्यालयात आज प्रभाग समितीची बैठक अध्यक्षा रोहिणी चिमटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीत प्रभागामध्ये प्रगतीपथावर असलेल्या सर्व विकासकामांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी नवनियुक्त सहाय्यक आयुक्त श्री. गोविंद दांगट यांचे सर्व नगरसेवकांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
प्रगतीपथावर असलेली सर्व विकासकामे जलद गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, तसेच प्रलंबित विकासकामांबाबतची प्रशासकीय कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील स्वच्छता, रस्ते दुरुस्ती व इतर आवश्यक कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका मयुरी कोकाटे, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका भक्ती गायकवाड, नगरसेविका सौ. सपना छाजेड यांच्यासह सर्व नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
















