अपूर्ण कामांमध्येच हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन; नागरिकांच्या वाट्याला दिलासा की निराशा?

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर या बहुप्रतीक्षित मेट्रो मार्गावरील अनेक कामे अद्याप अपूर्ण असतानाच मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करून हिंजवडी आयटी पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप अनेक कामे पूर्ण झालेली नाहीत. काही मेट्रो स्थानकेही प्रवाशांसाठी सुरू होणार नसल्याने उद्घाटनानंतरही प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना मार्गाखालील रस्त्यांची दुरुस्ती, पदपथ आणि इतर पायाभूत सुविधांची कामेही पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था कायम असून खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मेट्रोचे उद्घाटन जवळ आले असतानाही अपूर्ण कामे तशीच असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना मार्गाखालील रस्त्यांची दुरुस्ती, पदपथ आणि इतर पायाभूत सुविधांची कामेही पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था कायम असून खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मेट्रोचे उद्घाटन जवळ आले असतानाही अपूर्ण कामे तशीच असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, मेट्रो मार्गिकेशी संबंधित विद्यापीठ चौकातील पुलाच्या डाव्या आणि उजव्या बाजूचे उद्घाटन दोन वेगवेगळ्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते. आता मेट्रो मार्गिकेचे तिसरे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. उर्वरित सहा स्थानके सुरू झाल्यानंतर पुन्हा राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे का, असा उपरोधिक सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मेट्रो सुरू झाल्याने हिंजवडी परिसरातील नागरिक आणि आयटी कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, अपूर्ण स्थानके आणि परिसरातील रखडलेल्या कामांमुळे या सुविधेचा पूर्ण लाभ कधी मिळणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.दरम्यान, मेट्रो उद्घाटनाच्या निमित्ताने तरी बाणेर रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, तसेच रस्त्याच्या दुभाजकासाठी लावण्यात आलेले दगड व्यवस्थित बसवून परिसरातील रस्ते सुरक्षित आणि वाहतुकीसाठी सुस्थितीत करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. उद्घाटनाच्या सोहळ्याबरोबरच प्रत्यक्ष कामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

See also  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्तांकडून आढावा

दरम्यान, मेट्रो उद्घाटनाच्या निमित्ताने तरी बाणेर रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, तसेच रस्त्याच्या दुभाजकासाठी लावण्यात आलेले दगड व्यवस्थित बसवून परिसरातील रस्ते सुरक्षित आणि वाहतुकीसाठी सुस्थितीत करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. उद्घाटनाच्या सोहळ्याबरोबरच प्रत्यक्ष कामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.