मांजरी पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन साजरा; सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

मांजरी : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मांजरी पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. तसेच भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सरदार वल्लभभाई पटेल आणि स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मांजरी पोलीस ठाण्याच्या आवारात सायंकाळी ५.३० वाजल्यापासून मोठ्या टीव्ही स्क्रीनवर राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.

या कार्यक्रमाला मांजरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांच्यासह सात सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, २७ पोलीस अंमलदार, मोहल्ला कमिटीचे सदस्य, मांजरी गावचे पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते. राष्ट्रीय एकात्मता, बंधुता आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

See also  बाणेर पोलीस स्टेशनसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार शहर सरचिटणीस राजेश दिनकर बालवडकर यांच्या वतीने एअर कुलर भेट