पुणे : केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर कोथरूड मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भगवानतात्या निम्हण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून उत्साहात करण्यात आले.
यावेळी कोथरूड मंडळाचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, औंध प्रभाग समितीच्या अध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी चिमटे, सरचिटणीस मोरेश्वर बालवडकर, महेश सुतार, राजू पाषाणकर, अशोक पाषाणकर, उत्पात काका, अमोल पाटील, टोळे काका, जोशी काका तसेच ओम ब्लड बँकेचे सहकारी उपस्थित होते.
रक्तदान हे श्रेष्ठदान असून, रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडते. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांनी अशा सेवाभावी उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे आणि रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून सामाजिक सेवेचा संदेश देण्यात आला. रक्तदान हेच श्रेष्ठदान या भावनेतून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
















