हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आंदोलनाचा निर्णय; जयराम सहकारी गृह रचना संस्थेसह सर्व संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक; आंदोलनाचा ठराव एकमताने मंजूर

केळेवाडी : जयराम सहकारी गृह रचना संस्था तसेच संलग्न विविध संस्थांच्या प्रतिनिधींची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे आंदोलन करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

सर्वे क्रमांक ४४ मधील रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शासन व संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आंदोलनाची पुढील दिशा, नियोजन आणि विविध संस्थांचा सहभाग याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. या ठरावाला जयराम सहकारी संस्था यांच्या वतीने सचिन यादव तसेच हनुमान नगर रहिवासी संघाच्या वतीने भूषण शिर्के यांनी अनुमोदन दिले.

तसेच राऊतवाडी बचाव समितीचे संतोष चव्हाण आणि राजीव गांधी पार्कचे ऋषिकेश दरेकर यांनी अनुसूचक म्हणून ठरावास संमती दिली.

ठरावाच्या प्रक्रियेत राजेंद्र रामचंद्र भगत, नामदेवराव सोपानराव मारणे, प्रफुल्ल सोपान शिंदे, निकुंज उभे, राहुल पळसकर, संदीप लक्ष्मण शिंदे, स्वप्निल ज्ञानेश्वर भोसले, राहुल प्रल्हाद वांजळे, सौ. सुमती यादव, सोनाली नवनाथ वाशिवले आणि आशा राजेंद्र भगत यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

बैठकीत सर्व संस्थांच्या प्रतिनिधींनी एकजुटीने भूमिका मांडत मुंबईतील आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. येत्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात सर्वे क्रमांक ४४ मधील रहिवाशांच्या प्रश्नांना शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी आंदोलनाची व्यापक तयारी करण्याचे ठरविण्यात आले.

See also  नदी पुनरूज्जीवन प्रकल्प करिता 'एक्सपिरीयन्स सेंटर साठी' पंडित भीमसेन जोशी कलादालनातील 'आर्ट गॅलरी' मुदत संपूनही बंद