विद्यार्थ्यांच्या नैतिक मुल्यांच्या वाढिसाठी शिक्षणात आध्यात्माचा समावेश करा – ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर

पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या प्रथेप्रमाणे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक गुरूवर्य शंकरराव कानिटकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा यावर्षीचा पुरस्कार
प्रसिध्द प्रबोधनकार व कीर्तनकार मा ह. भ. प. श्री निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना मा ना श्री मुरलीधर मोहोळ,सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री, भारत सरकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू मा प्रा डाॅ पराग काळकर  व पी ई सोसायटीचे कार्याध्यक्ष मा प्रा डाॅ गजानन एकबोटे उपस्थित होते.


सत्काराची पाश्वभुमी सांगताना डाॅ एकबोटे म्हणाले गेली ३४ वर्ष हा पुरस्कार सर्व क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणार्या ऋषीतुल्य व्यक्तींना दिले आहेत. गुरूवर्य कानिटकरांच्या कार्याचा हा सन्मान व त्यांच्या कतृत्वाचे ऋण या पुरस्काराने संस्था व्यक्त करत आहे.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना


मा श्री मुरलीधर मोहोळ म्हणाले,” दर्जेदार शिक्षणाची ९२ वर्षाची परंपरा असणार्या या संस्थेत शैक्षणिक भविष्याला दिशा देणारे, समाजाचा प्रवास दाखविणारे, मार्गदर्शन करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठे योगदान असण्यार्या व्यक्तींना पुरस्कार ही वैभवशाली परंपरा आहे. पुण्यनगरीची ओळख या पुरस्काराने कायम ठेवली आहे.
मा प्रा डाॅ पराग कालकर यांनी एक शिक्षकाने अखंड शिक्षणाचे व्रत घेतले, रूढी आणि परंपरेला बाजूला सारण्याचे काम
चुकीच्या प्रथांना निवृत्ती  देण्याचे काम हे किर्तनातुन करणार्या निवृत्ती महाराजांना हा पुरस्कार मिळाला आहे असे मत व्यक्त केले आहे.

सत्काराला उत्तर देताना मा इंदोरीकर महाराज म्हणाले, “माणसाची उंची  कर्तृत्व व  ज्ञानावर ठरते. आत्मचितंन करा. उत्पती स्थिती लय म्हणजे देव. देवाचा ध्यास म्हणजे आधात्म.
आधात्मामुळे कुटुंब समाधानी राहते, मनाच्या मोठेपणासाठी आधात्म हवे. म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आध्यात्मिक शिक्षण संस्थेत द्या. संताचे विचार संस्थेत शिकवले पाहिजे.”


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डाॅ सौ जोत्स्ना गजानन एकबोटे यांनी केले. कार्यक्रामाची सुरवात सौ स्वाती पटवर्धन    यांच्या ईशस्तवननाने झाली. पसायदान सौ क्षिप्रा श्रीरंग पंढरपुरे यांनी केले. मानपत्राचे वाचन प्रा डाॅ सौ वैजयंती जाधव यांनी केले.
आभार प्रदर्शन मा प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रासंचलन प्रा डाॅ निवेदिता एकबोटे, उपकार्यवाह, पी ई सोसायटी यांनी केले. या प्रसंगी मा श्री विघ्नहरी महाराज देव, अध्यक्ष, पी ई सोसायटी, मा श्री अरविंद पांडे, उपकार्याध्यक्ष, पी ई सोसायटी, मा प्रा शामकांत देशमुख, कार्यवाह, पी ई सोसायटी,
मा प्रा सुरेश तोडकर, सहकार्यवाह,पी ई सोसायटी,  मा प्रा डाॅ सौ जोत्स्ना गजानन एकबोटे, सहकार्यवाह, पी ई सोसायटी संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य तसेच आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

See also  पुणे विद्यापीठात पाली भवन उभे राहणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी समाज कल्याण विभाग व विद्यापीठामध्ये करार