पुणे, दि. २९ नोव्हेंबर : भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या संकल्पानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १४० व्या भागाचे पुणे शहरात १,००० हून अधिक ठिकाणी यशस्वी आयोजन करण्यात आले. या संकल्पपूर्तीत भाजपा व्यापारी आघाडीचे पुणे शहराध्यक्ष महेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली भाजपा व्यापारी आघाडीच्या पदाधिकारी, व्यापारी बांधव आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नशामुक्त भारत, युवा सक्षमीकरण, मिशन कर्मयोगी, सायबर सुरक्षा, भारतीय उत्पादनांची वाढती निर्यात, युवा उद्योजकता, सांस्कृतिक वारसा, क्रीडा आणि आरोग्य अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर देशवासीयांशी संवाद साधला.
आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नशामुक्त भारत, युवा सक्षमीकरण, मिशन कर्मयोगी, सायबर सुरक्षा, भारतीय उत्पादनांची वाढती निर्यात, युवा उद्योजकता, सांस्कृतिक वारसा, क्रीडा आणि आरोग्य अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर देशवासीयांशी संवाद साधला.
सायबर फसवणूक रोखण्यासाठी ‘संचार साथी’ उपक्रमाचे महत्त्व सांगताना पंतप्रधानांनी पुण्यातील हिमांशू सिंह यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेतली. तसेच २०३२ मध्ये पुण्यात होणाऱ्या जागतिक सायकलिंग स्पर्धेचाही विशेष उल्लेख केला.
भारतीय चॉकलेट व कोको उत्पादनांच्या निर्यातीत झालेली जवळपास २५ टक्के वाढ, स्थानिक उत्पादनांना मिळणारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, अमूलचे नावीन्यपूर्ण उपक्रम आणि नवउद्योजकांसाठी निर्माण होणाऱ्या व्यावसायिक संधी हे व्यापारी व उद्योजक वर्गासाठी विशेष प्रेरणादायी मुद्दे ठरले. ‘मन की बात’ हा केवळ संवादाचा कार्यक्रम नसून, देशातील विविध क्षेत्रांतील सकारात्मक घडामोडी, नावीन्यपूर्ण उपक्रम, प्रेरणादायी यशोगाथा आणि उपलब्ध संधींची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणारे उपयुक्त व्यासपीठ आहे. नागरिकांमध्ये सामाजिक जागरूकता, आत्मनिर्भरता आणि कर्तव्यभावना निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे महेश गुप्ता यांनी नमूद केले.शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या संकल्पाची पूर्ती करण्यासाठी पक्षाच्या सर्व संघटनात्मक घटकांनी केलेले उत्तम नियोजन, संघभावना आणि सामूहिक प्रयत्न या आयोजनाच्या यशात महत्त्वपूर्ण ठरले. हे यश संपूर्ण संघटनेच्या एकजुटीचे आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे फलित असल्याची भावना महेश गुप्ता यांनी व्यक्त केली.
शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या संकल्पाची पूर्ती करण्यासाठी पक्षाच्या सर्व संघटनात्मक घटकांनी केलेले उत्तम नियोजन, संघभावना आणि सामूहिक प्रयत्न या आयोजनाच्या यशात महत्त्वपूर्ण ठरले. हे यश संपूर्ण संघटनेच्या एकजुटीचे आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे फलित असल्याची भावना महेश गुप्ता यांनी व्यक्त केली.
या यशस्वी संकल्पपूर्तीसाठी योगदान देणाऱ्या सर्व माननीय मंत्री, आमदार, नगरसेवक, मंडल अध्यक्ष, सर्व आघाड्या, मोर्चे व प्रकोष्ठ, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, व्यापारी बांधव, आयोजक, कार्यकर्ते तसेच समस्त पुणेकरांचे भाजपा व्यापारी आघाडीचे पुणे शहराध्यक्ष महेश गुप्ता यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून आभार व्यक्त केले.
















