विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वजवंदन

पुणे : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ अनिल रामोड, उपायुक्त वर्षा उंटवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वजवंदन

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

See also  स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील विधानभवन येथे केलेली आकर्षक विद्युत रोषणाई