दुर्गम माऊंट मेरू मोहिमेसाठी योगीराज पतसंस्थेची आर्थिक मदत


         एव्हरेस्टपेक्षा अवघड व आजपर्यंत एकाही भारतीय गिर्यारोहकांनी प्रयत्न सुद्धा न केलेल्या खडतर अशा माऊंट मेरू या मोहिमेसाठी योगीराज पतसंस्थेच्या वतीने रु 25 हजाराच्या मदतीचा धनादेश संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांच्या हस्ते व पोलीस उप-अधीक्षक अरुण सावंत यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला .

यावेळी झालेल्या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर साहेब यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांची माहीत दिली. याप्रसंगी  उपाध्यक्ष राजेश विधाते,शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे पाटील व सर्व स्टाफ उपस्थित होता तसेच श्री म्हसोबा देवस्थान मंडई पुणे यांना  वार्षिक उत्सवानिमित्त 15 हजार रु चा धनादेश देण्यात आला.

See also  नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांचा आदर्श निर्णयनगरसेवक म्हणून मिळणारे मानधन नाकारले; गरजू रुग्णांसाठी महापौर निधीला वर्ग