पाषाण येथे नवचैतन्य हास्य परिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त मान्यवरांचा सत्कार

पाषाण : पाषाण येथे नवचैतन्य हास्ययोग परिवार वाकेश्वर शाखेच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त मृदुंगाचार्य पांडुरंग आप्पा दातार,  समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, डॉ. दिलीप गरुड यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, उत्तम कदम, आदी उपस्थित होते. यावेळी नवचैतन्य हास्ययोग परिवार वाकेश्वर शाखेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी डॉ. दिलीप गरुड यांनी गुरु शिष्य या संदर्भामध्ये उद्बोधक अशी एक कथा सांगितली. प्रथम योग प्रार्थना व गुरु स्तवन गिते सादर करून कार्यक्रम सुरु झाला. शाखेच्या अध्यक्ष प्रतिभा त्रिमांदे यांनी स्वागत केले व शाखेचा परिचय करून दिला. शाखेच्या उपाध्यक्ष सौ. येळवंडे वासंती यांनी समाजभूषण शांताराम महाराज निम्हण यांचा परिचय सांगितला.  श्रीमती रजनी देशपांडे यांनी पांडुरंग आप्पा दातार यांचा परिचय करून दिला. सौ. कुसुम पाषाणकर यांनी डॉ. दिलीप गरुड सरांचा परिचय वाचून दाखवला.  श्री. प्रमोद जहागीरदार सरांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन त्रिमांदे ताई यांनी मानले.

See also  पुणे विद्यापीठात पाली भवन उभे राहणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी समाज कल्याण विभाग व विद्यापीठामध्ये करार