पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हुकूमशाहीचा पराभव – उद्धव ठाकरे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जोरदार प्रचारानंतही भाजपने कर्नाटक गमावला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हुकूमशाहीचा पराभव आहे. या हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरूवात कर्नाटकातून झाली आहे.
पुढे ठाकरेंनी म्हणाले, या निवडणुकीनंतर कर्नाटकनं देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली आहे. मोदी आणि शहांच्या बळजबरी सत्तेच जोखडं कर्नाटकच्या जनतेनं निर्भयपणे फेकलं आहे. कर्नाटकात हिंदू-मुस्लिम, बजरंग बली, हिसाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. काॅंग्रेसने लोकांच्या प्रश्नावर निवडणुक लढविली आणि ती जिंकली. 2024 सालच्या विजयाची नांदी आहे. यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे खास अभिनंदन. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

See also  ‘विकसित भारत’ लक्ष्य प्राप्तीसाठी विकसित शिक्षण प्रणाली व आरोग्य व्यवस्था आवश्यक – राज्यपाल रमेश बैस