वसुंधरा अभियान बाणेरला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्रदान, राज्यस्तरीय तृतीय क्रमांक

पुणे : वसुंधरा अभियान बाणेरला महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते, वसुंधराच्या १६ वर्षांच्या हरित कार्यास, महाराष्ट्र शासनाचा वृक्षारोपण मधील सर्वोच्च असा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार- राज्यस्तरीय तृतीय क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सर्व सदस्यांच्या अपार मेहनतीचे फळ आहे.
गेल्या सोळा वर्षात, संस्था ऊभारणीत अनेक संकटे आली, खूप त्रास झाला , शेवटी त्याचे आज फळ मिळाले.
आपल्याला आतापर्यंत अनेक सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत, परंतु शासनाच्या स्तरावर सर्वोच्च असा पुरस्कार संस्थेला आज मिळाला याचा आनंद होत असल्याचे यावेळी वसुंधरा यांचे पांडुरंग भुजबळ, संजय नाना मुरकुटे यांनी सांगितले.
पुरस्कार हे आपले अंतिम ध्येय नसून ,आपले हरित कार्य करण्यास हे पुरस्कार प्रेरणा देत असतात, यामुळे नवीन सदस्य जोडण्यास मदत होते.

फार कष्टातून ही संस्था उभी राहिली आहे, अनेक संकटे आली, तरी न डगमगता ही संस्था उभी राहिली आणि आज त्याचा सन्मान मंत्री ,पालकमंत्री यांच्या हस्ते झाला अशा भावना यावेळी वसुंधरा अभियानच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी वसुंधरा अभियानला राज्यात तिसरा क्रमांकाचे
पन्नास हजार रुपये व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

See also  पदवीधर विकास'च्या "बांधिलकी" विशेषांकाचे प्रकाशन