आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न

बोपोडी : बोपोडी गोरगरीब आणी गरजूवंतांना मदतीचा हात देणे हेच उद्दिष्ट डोळ्या समोर ठेऊन समाजात कार्य करणारे आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनिल भिसे यांच्या प्रयत्नातून आणि निरंजन सेवा भावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी नगर भागाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा बोपोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या प्रसंगी जेष्ठ विधी तज्ञ ऍड. एस के जैन, माजी नगरसेवक श्रीकांतजी पाटील, उद्योजक दिलीपशेठ मुंदडा, औंध फाउंडेशन अध्यक्ष अभिजित गायकवाड, सचिन वाडेकर, राजेंद्र भुतडा, आनंद कासट, निमंत्रक आयोजक अनिल भिसे, ऍड. रमेश पवळे, अनिल तिळवणकर, गणेश नाईकरे, प्रशांत टेके, सादिकभाई शेख, अमोल निकुडे, सदाशिव वाघमारे, ज्योतीताई भिसे, देवकुळे ताई, कमलताई गायकवाड, कांता ढोणे, वसुधाताई नीरभवणे, शोभाताई आरुडे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल भिसे आणि सूत्रसंचालन दत्ता सूर्यवंशी यांनी केले.

See also  सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस