आप च्या स्वराज यात्रेची पंढरपुरातून जोरदार सुरुवा

सोलापूर : पंढरपूर ते रायगड अशी 800 किलोमीटर स्वराज यात्रेची सुरुवात पंढरपुरामध्ये विठू रखमाईचा आशीर्वाद घेऊन झाली. आम आदमी पार्टी चे राष्ट्रीय सहसचिव आणि महाराष्ट्राचे सह प्रभारी युवा नेते गोपाल इटालिया यांच्यासह रंगा राचुरे, अजित फाटके पाटील, प्रीती शर्मा मेनन, एम. पाटील तसेच अनेक पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते.

पंढरपुरात विठ्ठल रखुमाई च्या देवळामध्ये दर्शन घेतल्यावर शिवाजी चौकात छत्रपती शिवरायांना आणि आंबेडकर चौकामध्ये डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करून पंढरपूर गावांमधून घोषणा देत यात्रा पुढे मंगळवेढामार्गे सोलापूर कडे रवाना झाली. आजच्या यात्रेला पंढरपुरातील जोरदार प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील दोन -तीन हजार कार्यकर्ते या यात्रेमध्ये सामील झाले आहेत.

महाराष्ट्रामध्ये सर्वच निवडणुकांना स्थगिती असल्यामुळे सर्वत्र प्रशासनच राज्य करीत आहे. प्रशासनामार्फत भाजपच दडपशाहीचा कारभार महाराष्ट्रात करीत आहे. जगामधील सर्वात मोठा पक्ष म्हणून देणारा भाजप महाराष्ट्रात मात्र निवडणूक हरण्याच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या जातील असे धोरण राबवत आहे असे गोपाल इटालिया यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून महाराष्ट्रातील फडणवीस शिंदे सरकार या प्रश्नांची उत्तरे टाळत आहे. विमा योजना ही कंपन्यांची नफेखोरी करणारी लॉटरी योजना आहे. याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाही. पंढरपुरातील साखर कारखाना भ्रष्टाचारा वरती सुद्धा यांनी टीका केली.

येणाऱ्या काही महिन्यांमध्ये स्थानिक निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या निवडणूक तयारीचा भाग म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील ही स्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे.

See also  राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त आयआयटीएममध्ये खुला दिवसाचे आयोजन करण्यात आले होते