बोरघर येथे ‘सेंद्रिय शेती’ कार्यशाळेस आदिवासी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे :आंबेगाव तालुक्यातील बोरघर येथील आनंद कपूर प्रशिक्षण केंद्रामध्ये परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत आदिवासी भागात सेंद्रिय शेती करण्यामध्ये भाग घेतलेल्या १४ शेतकरी गटांच्या प्रशिक्षणाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणास दुर्गम भाग असूनही आदिवासी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी विभागीय कृषि सहसंचालक रफिक नाईकवाडी, आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे, उपविभागीय कृषि अधिकारी सतीश शिरसाठ उपस्थित होते.

प्रशिक्षण सत्रात श्री. नाईकवाडी यांनी पर्यावरणपूरक शेती पद्धतीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. परंपरागत कृषि विकास योजना अंतर्गत सेंदीय शेती प्रमाणीकरण विषयी सहभागी शेतकऱ्यांकडून अपेक्षित कार्यपद्धतीविषयीही माहिती देण्यात आली.

सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाचे निकष समजून घेवून व्यावसायिक दृष्टीकोनातून प्रमाणित विषमुक्त सेंद्रिय शेतमालाचे उत्पादन करावे यासाठी वेळोवेळी आत्मा यंत्रणेमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे श्री. हिरेमठ यांनी सांगितले.

यावेळी सेंद्रिय शेती व सेंद्रिय पद्धतीने भात उत्पादन तंत्रज्ञानामध्ये भाताच्या बीज प्रक्रियेपासुन पीक काढणी पर्यंतच्या विविध टप्यामधील विविध पद्धतीचा अवलंब, थर्ड पार्टी प्रमाणीकरण प्रक्रियेमध्ये अपेक्षित असलेली विविध मानके/निकष सांगून सहभागी शेतकऱ्यांनी पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या, सेंद्रिय शेती पद्धती याविषयी तज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच लातूर येथील स्वतः सेंद्रिय शेती मध्ये उत्कृष्ट काम करणारे नामांकित शेतकरी मनोहर भुजबळ यांनी स्वतः सेंद्रिय शेती मध्ये केलेले प्रयोग त्यामध्ये रासायनिक शेतीला पर्याय म्हणून सेंद्रिय खते व किटकनाशके,बुरशीनाशके तयार करण्या विषयी व तसेच प्रत्यक्षात प्रभावी पद्धतीने सेंद्रिय शेती करून उत्पन्नात कशी वाढ करावी याविषयी माहिती दिली.

See also  मोहोळ खासदार झाल्यावर गुन्हेगारांना पाठीशी घालतील -काँग्रेस प्रवक्ते‌ अतुल लोंढे यांची‌ टीका