पुणे : चांदणी चौक रंगाला सजला पण बसथांबा उन्हात असल्याने
पुण्यातील तसेच मुळशी तालुक्यातील प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.
चांदणी चौकात पी एम पी एल ने बसथांब्यावर पाटी लावली पण शेड बांधले नाही. यामुळे चांदणी चौकातून प्रवास सुरू करण्याआधी नागरिकांना धोकादायक परिस्थितीमध्ये रस्त्यावर उभे रहावे लागते. प्रवाशांसाठी चौकामध्ये बस थांब्यावर शेड नसल्यामुळे नागरिकांना उन्हातच ताटकळत उभे राहावे लागते.
सगळी कडे चादणी चौकातील रंगरंगोटी चे कोतुक होत आहे मात्र जनेतेचा वाट्याला उन्हातला बसथांबा कायम आहे. पुलासाठी सुमारे 1200 कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु बस थांब्यासाठी निधी कधी उपलब्ध होणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.
चांदणी चौकातील प्रवाशां करिता सर्व सोयसुविधा युक्त असे वॉशरूम, पिण्याचे पाणी, तसेच ऊन्ह वारा पाऊस यापासुन संरक्षण मिळेल अशा बसथांबे नागरिकांना मिळावेत तसेच प्रवाशांची गरज दूर करण्यात यावी अशी मागणी मुळशी तालुका शिवसेनेच्या वतीने पुणे उपजिल्हा संघटक सचिन दगडे व तालुका संघटक अमित कुडले यांनी केला आहे.