मेट्रो व एल अँड टी च्या ढिसाळ कामांबाबत मनपा ची जबाबदारी नाही काय❓️ एरंडवाना कर्वेनगर येथील प्रलंबित कामांबद्दल भाजपाचे संदीप खर्डेकर यांचा आयुक्तांना प्रश्न

कोथरूड‌ : एरंडवणे व कर्वेनगर भागात मेट्रो व एल अँड टी च्या प्रलंबित कामांबाबत भाजपाचे संदीप खर्डेकर यांनी दिनांक 11 मे रोजी आपणास तक्रार अर्ज दिला होता. सदर कामं 18 मे पूर्वी पूर्ण होतील व रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल असे पुणे महानगरपालिका आयुक्त व पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. मात्र महिना उलटून गेला तरी खोदकाम जैसे थे च स्थितीत आहे. यामुळे पुणे मेट्रो आणि एल अँड टी च्या ढिसाळ कामाबाबत मनपाची जबाबदारी नाही काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मनपा ने विठ्ठल मंदिर रस्त्यावर मेट्रो च्या खोदकामाचा भाग सोडून इतरत्र डांबरीकरण करून टाकले आहे.
तर समर्थ पथावरील महत्वाच्या शक्ती 98 चौकात ( देवेश चितळे, रमांबिका मंदिरासमोर ) एल टी ने भर चौकात खोदकाम करून अर्धवट अवस्थेत सोडले आहे व येथे बरेच दिवस कामं बंद आहे व तेथे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच शैलेश पुलावरील कामं झाले तरी सर्वत्र राडारोडा पडलेला असून, धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. तेथे पादचारी मार्गावर मोठे पाईप देखील पडून आहेत यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे.

ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत व दुरावस्था झालेल्या समर्थ पथाचे डांबरीकरण करावे. पावसाळा आला असल्याने कधी डांबर मिळणार नाही, कधी प्लॅन्ट बंद असेल तर कधी धो धो पाऊस !! मात्र ह्या कारणांच्या आड प्रशासन दडेल आणि सामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागेल. म्हणून पालिका आयुक्तांनी याकडे तातडीने लक्ष देऊन त्वरित हे कामं पूर्ण करावे अशी आग्रही मागणी भाजपाचे संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

See also  ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी जनजागृतीवर भर द्या- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे