वाढदिवसा निमित्त भेट वस्तू व गुच्छ वरील खर्च गोरगरिबांच्या मदतीसाठी देऊन वाढदिवस केला साजरा

बाणेर : योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त कोणीही बुके अथवा भेट वस्तू आणू नयेत त्याऐवजी तेवढी रक्कम गोर गरीब लोकांना दान करा, त्याच माझ्यासाठी शुभेच्छा असतील असे अनोखे आवाहन केले. त्यांचा हा उपक्रम खरोखर स्तुत्य असून सर्वांनी याचा अवलंब केला पाहिजे अशी अभीष्टचिंतन सोहळा प्रसंगी नागरिकांमध्ये चर्चा रंगली होती.
याप्रसंगी योगीराज पतसंस्थेने उच्च शिक्षणासाठी दत्तक घेतलेल्या श्रुती चमरे हिला बी टेक च्या तिसर्‍या वर्षाची फी भरण्यासाठी 35 हजार रुपयांची तापकीर यांच्या हस्ते मदत करण्यात आली. तसेच सभासदांना 60 लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले.


याप्रसंगी इस्कॉन चे प्रभू, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, उद्योजक विजय बोत्रे, अशोकराव मुरकुटे, लहु बालवडकर, नानासाहेब ससार, श्रीकांत पाटील, संजयबापू बालवडकर, भगवान पठारे, गुलाबराव वाघोले, संग्राम मुरकुटे, देविदास मुरकुटे, विजय विधाते, श्रीकांत जाधव, संजय निम्हण, हेमंत निम्हण, अनिल बालवडकर, श्रीराम समर्थ पतसंस्थेचे सुधाकर धनकुडे, नारायण चांदेरे, विश्वास मुरकुटे, योगीराज पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, आप्पाजी सायकर, तज्ञ संचालक भानुप्रताप बर्गे, संचालिका वैशाली विधाते, रंजना कोलते, अलका सिरसगे, माजी संचालक वसंत माळी, अशोक रानवडे, अमर लोंढे, हितेश तापकीर, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके, भाग्यशाली पठारे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, शाखा समिती सदस्य, स्टाफ यांनी तापकीर यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे यांनी केले.

See also  नगररोड क्षत्रिय कार्यालयाची अनधिकृत केबलवर कारवाई