दिल्ली पंजाब प्रमाणेच शिक्षण,आरोग्य, वीज,पाणी या नागरिकांच्या हक्काच्या सुविधा आप मांजरीतील नागरिकांना देईल

मांजरी – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब व दिल्लीमध्ये जे स्वराज्य निर्माण केले.जनतेला शिक्षण आरोग्य, वीज, पाणी या मूलभूत सुविधा विनामूल्य दिल्या. अशाच पद्धतीने मांजरी बुद्रुक येथील माळवाडी कुंजीरवस्ती, सटवाईनगर, वेताळ वस्ती, राजीव गांधीनगर, ७२ घरकुल, ११६घरकुल, इत्यादी झोपडपट्टी भागासह गावठाणमध्ये मोफत पाणी, आरोग्य, शिक्षण, वीज, देण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन राजेंद्र साळवे यांनी दिले.

मांजरी बुद्रुक येथे आम आदमी पार्टीचे प्रभाग अध्यक्ष राजेंद्र साळवे यांच्यावतीने स्वराज्य संवाद यात्रा त्यानिमित्ताने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेत पक्षातर्फे गणेश ढमाले तसेच त्यांचे सहकारी लक्ष्मण भोसले अध्यक्ष
आईसाहेब प्रतिष्ठान मांजरी बुद्रुक, बाळासाहेब घुले, नीलेश भोसले, पप्पू भोसले, गंगाराम खरात,विशाल भोसले, बाळासाहेब रणपिसे, दीपक जगताप,दत्तात्रय ननवरे, रोहन गायकवाड, महेंद्र लोंढे, दादा भंडारी, परशु भंडारी, रोशन ढिले आदी उपस्थित होते. बाळासाहेब घुले, लक्ष्मण भोसले यांनी यावेळी
मनोगत व्यक्त केले. आभार सुनीता ढेकणे यांनी मानले. यावेळी परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

See also  महापालिकेकडून नवले पूल ते सिंहगड रोड वर अतिक्रमणावर हातोडा