सिंहगड रोड उड्डाणपूल सुरू करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे “ॐ फट स्वाहा आंदोलन”

पुणे : सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी ते माणिकबाग हा उड्डाणपूल पूर्ण होऊनसुद्धा फक्त सत्ताधारी नेत्यांच्या उद्घाटनासाठी वेळ न मिळाल्याने जनतेला वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या या ज्वलंत प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, पुणे शहराच्या वतीने आज आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले.

सिंहगड रोडवरील नवीन उड्डाणपुलावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेसमोर “ॐ फट स्वाहा” म्हणत होम-हवन करून पूल जनतेसाठी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान “सिंहगड रोडवासीयांना ट्रॅफिक जॅममध्ये अडकवणाऱ्या सरकारचा निषेध होवो” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, “पुलाचे काम जनतेच्या कररूपी पैशातून पूर्ण झाले असूनही केवळ सत्ताधाऱ्यांच्या उद्घाटन सोहळ्याच्या हव्यासापोटी नागरिकांची गैरसोय केली जात आहे. आज पुण्यातच असले तरी मुख्यमंत्री फडणवीस उड्डाणपुलाचे उद्घाटन करायला आले नाहीत. कारण फक्त दोन दिवसांच्या पावसात या नव्या पुलावर खड्डे पडले आहेत. पुढील पाच दिवसांत पूल सरकारने सुरू केला नाही तर शिवसेना स्वतःच्या पद्धतीने जनतेसह या पुलाचे उद्घाटन करेल.”

यावेळी आंदोलनस्थळी पुणे मनपा चे प्रकल्प अधिकारी संभाजी कोटकर उपस्थित होते त्यांनी येत्या ४ दिवसात सर्व कामे पूर्ण करून हा उड्डाणपूल सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.

या आंदोलनात शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, महिला आघाडीच्या पदमा सोरटे, सचिन पासलकर, संतोष गोपाळ, नितीन वाघ, महेश मते, गोकुळ करंजावणे, अनंत घरत, किशोर रजपूत, महेश पोकळे, अमोल दांगट, सूरज लोखंडे, वैभव हनमघर, पराग थोरात, दिलीप पोमण, राजाभाऊ चव्हाण, शिवा पासलकर, नाना मरगळे, नागेश खडके, प्रसाद गिजरे, मिलिंद पत्की, उमेश सुर्वे, अरुण घोघरे, दत्ता घुले, संग्राम गायकवाड, निलेश वाघमारे, महेश विटे, गणपत खटपे, धनंजय खाडे, प्रथमेश भुकन, कल्पेश वाजे, केतन शिंदे, विनायक नलावडे, आकाश यादव तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

See also  “एक वसुंधरा, एक आरोग्य हा आमचा संकल्प आहे” — सन्मती बाल निकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा