राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओबीसी सेलची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पक्षाच्या ओबीसी सेलची आढावा बैठक संपन्न झाली.

ओबीसी सेलच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेला ओबीसी विभागाकडून प्रचंड सहकार्याची अपेक्षा आहे. बूथ कमिटी आणि ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या पक्षाच्या उपक्रमांमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने सहभाग घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या आढावा बैठकीत नवनिर्वाचित ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे आणि कार्याध्यक्ष राज राजापूरकर यांनी ओबीसी सेलच्या माध्यमातून होणाऱ्या कामाची प्राथमिक रुपरेषा मांडली. यावेळी प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख तसेच ओबीसी सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी, तालुकाध्यक्ष उपस्थित होते.

See also  आगामी निवडणुकांत ओबीसी, आरक्षणवाद्यांची सत्ता आणा, लढवय्या धनगर समाजाने 'ओबीसी'चे नेतृत्व करावे - ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन; सकल धनगर समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन