पुणे : पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांच्या मिळकतकर कर पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी ग्रामपंचायतच्या धर्तीवर दुप्पट कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने जाचक कर रद्द करुन समाविष्ट गावातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. याबद्दल हवेली तालुका नागरी कृती समितीच्या वतीने पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी हवेली तालुका कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील , माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण, पोपटराव खेडेकर, संतोष ताठे, दिनेश कोंढरे, मिलिंद पोकळे, सुभाष टकले, माजी सरपंच अमर चिंधे, त्रिंबक मोकाशी, राजेंद्र भिंताडे, अनिता इंगळे, शिवाजी मते, अतुल धावडे, राजाभाऊ वाडेकर, दिपक बेलदरे, नितीन जांभळे, आदि उपस्थित होते.
समाविष्ट गावात पुढील दोन महिन्यात सुधारित धोरणानुसार कर आकारणी करण्यात येणार आहे. हवेली तालुका नागरी कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले की, आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाची अमलबजावणी वेळेत पूर्ण न झाल्यास कृती समितीच्या वतीने पुणे महापालिकेच्या दारात तीव्र आंदोलन करण्यात येईल . गावे पालिकेत गेल्यापासून कृती समिती ही अन्यायकारक कराच्या विरोधात लढा देत होती. मागील काळातही अनेक आश्वासने देण्यात आली होती.