रशियातील ‘रशियन फ्रेंडशिप कप रेस’ मध्ये सार्थक चव्हाण याने टीम इंडियाला पहिल्यांदाच 5 व्या क्रमांकावर स्थान मिळवून दिले

पुणे : रशिया येथे झालेल्या रशियन फ्रेंडशिप कप रेस मध्ये 19 देशांचा सहभाग असणाऱ्या स्पर्धेत टीम इंडियाच्या सार्थक चव्हाण याने आकर्षक कामगिरी करून टीम इंडिया ला पहिल्यांदाच 5 व्या क्रमांकावर स्थान मिळवून दिले.

आव्हानात्मक ट्रॅक आणि रशियातील हवामानाला जुळवून घेऊन प्रत्येक रेस मध्ये 40 स्पर्धकांना मागे टाकण्याचं आव्हान होत. ते सार्थक ने आपल्या कौशल्य आणि जिगर पणास लाऊन जिंकून आणल.

दिवसेदिवस अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून जेव्हा जेव्हा देशांचा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली सार्थक ने संधीचा सोनं करून देशाला पदक जिंकून आणले.आता सार्थक आशिया टॅलेन्ट कप ची तय्यारी करतोय .

प्रशिक्षक अमोल तळपदे यांचे अभिनंदन केले. तसेच श्याम कोठारी , प्रवीण वाल्हेकर, गिरिराज सावंत यांचे विशेष आभार व्यक्त केले.

See also  ६५ वा महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे