पाषाण येथील आय आय टी एम कॉलनी व सीडॅक कंपनी गेट समोरील खड्डा त्वरित बुजविण्याची मागणी

पाषाण : पाषाण रस्त्यावरील पंचवटी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील आय आय टी एम कॉलनी या केंद्रशासनाच्या संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या निवासाच्या गेट समोरील व सीडॅक कंपनी (प्रगत संगणन विकास केंद्र) या शासनाच्या संस्थेच्या गेट समोरील रस्ता पालिकेच्या ठेकेदाराकडून गेले अनेक दिवसापूर्वी काम करतेवेळी रस्ता व पदपथ उकरण्यात आला होता परंतु अनेक दिवस होऊनही तो बुजविण्यातही आला नाही.

पंचवटी रस्त्यावरील या ठिकाणि वळणाचा आहे आणि त्यात या ठिकाणी खोदून ठेवण्यात आले आहे. अनेक दुचाकी चारचाकी चालकांना व स्थानिक रहिवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण पंचवटी रस्त्यावर खड्डे खोदण्यात आले होते. पंचवटी रस्ता हा पुढे पुणे शहराला मिळत असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. गेल्या अनेक दिवसांपासून येथील पदपथ बंद असल्याने वाहनचालकास अंधारामुळे खड्डा दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गुरुवारी जाधव नावाच्या व्यक्तीचा गाडीचं या खड्ड्यात गेल्याने मोठी दुखापत झाली आहे. तसेच गेल्या ५ ते ६ दिवसात या ठिकाणी अनेक वेळा छोटे मोठे अपघात झाले आहे. त्यामुळे या प्रकाराला कंटाळून स्थानिक रहिवासी, व वाहनचालक मनसे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांच्या कार्यालयात येऊन तक्रारी करत आहेत.


तरी एखादा मोठा अपघात होण्याची वाट न पाहता येत्या २ दिवसात खड्ड्याची पाहणी करून सदरचा खड्डा दुरुस्त करावा. जर येत्या २ दिवसात खड्ड्यांची दुरुस्ती झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. जर या काळात कोणत्याही प्रकारचा अपघात सर्वस्वी आपणास जबाबदार धरले जाईल आपण याची नोंद घ्यावी अशाप्रकारचे निवेदन महापालिका सहाय्यक आयुक्त, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय, औंध, पुणे यांना देण्यात आले. यावेळी यावेळी मनसे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, उपविभागाध्यक्ष पांडुरंग सुतार, शाखाध्यक्ष शिवम दळवी, मयूर सुतार, अशोक मराठे, प्रभाग सचिव संदीप काळे, प्रभाग अध्यक्ष गणेश साळी व मनसैनिक उपस्थित होते.

See also  हांडेवाडी नवले वस्ती रोड येथील काँक्रीट रोड खालील खडी वाहून गेल्याने रस्ता खचण्याची शक्यता, शिवसेनेची दुरुस्तीची मागणी