सुसरोड बाणेर येथील कचरा प्रकल्प हटवण्यासंदर्भात माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बैठक

बाणेर : सुस रोड बाणेर परिसरातील कचरा प्रक्रिया प्रकल्प पुणे महानगरपालिकेच्या वतीने अयोग्य जागी उभारला असून या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये नागरिकांच्या वतीने लढा दिला जात आहे.

पुणे महानगरपालिकेच्या विरोधात सुरू असलेल्या सुस रोड बाणेर विकास मंचच्या सुप्रीम कोर्टातील लढा संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी सुस रोड बाणेर विकास मंचचे अध्यक्ष विनय देशपांडे, सचिव हरीश पाटील, उपाध्यक्ष सरला शिंदे, श्री राशनकर, वैभव मोहोळकर, भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर तसेच या परिसरातील विविध सोसायटी यांचे पदाधिकारी नागरिक व महिला उपस्थित होत्या.

पुणे महानगरपालिकेने उभारलेला कचरा प्रक्रिया प्रकल्प व यामुळे परिसरात पसरत असलेली दुर्गंधी याकडे वारंवार तक्रारी करून देखील महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे. प्रकल्प हलवण्याचे आदेश मा. सर्वोच्च न्यायालय व हरित लवादाने दिले असताना देखील पालिका याकडे दुर्लक्ष करत आहे.

पालिके विरोधात नागरिकांचा सुरू असलेला न्यायालयीन लढा तसेच सध्या प्रकल्पामुळे निर्माण होत असलेली दुर्गंधी व नागरिकांना होत असलेले त्रास याबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, नागरिकांच्या लढा सोबत सातत्याने पाठिंबा दर्शवला आहे. तसेच यापुढे देखील न्यायालय लढा तसेच प्रत्यक्षात रस्त्यावरील लढाई मध्ये देखील नागरिकांच्या सोबत राहून प्रकल्प हलवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

See also  केजरीवालांच्या अटके विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपची निदर्शने