नाशिक येथील शेतकरी संबंधी प्रश्नाबाबत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिक जिल्हा बॅंकेकडून शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत असल्यासंदर्भात भेट घेतली. कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बॅंकेला दूरध्वनीद्वारे दिले.

नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांच्या मागे कर्जत साठी तथा लावण्यात येत आहे. पावसाची ओढ लागल्याने आधीच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट असून शेतकरी संकटात असताना कर्ज वसुली होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

See also  कोथरूड मतदार संघावर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रचाराचा नारळ फोडून कामाला लागला – आमदार सचिन आहिर