काव्यांजली कवितासंग्रहाचे प्रकाशन

औंध : सीनियर सिटीजन असोसिएशन ऑफ औंध या संघाच्या मासिक सभेमध्ये विद्यांचल शाळेच्या सभागृहात निशा कोत्तावार यांच्या काव्यांजली या कवितासंग्रहाचे प्रकाशन संघाचे अध्यक्ष डॉक्टर आर टी वझरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्राचार्य पद्माकर पुंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास संघातील सर्व कार्यकारणी सदस्य आणि बहुसंख्य सभासद उपस्थित होते. याप्रसंगी निशा कोत्तावार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री दिलीप फडके यांनी केले. अपर्णा देशपांडे यांनी आभार मानले.

See also  समाजाची गरज लक्षात घेऊन उपक्रम राबविण्याची आवश्यकता - ना. चंद्रकांत पाटील