निवासी वापराचे महावितरण चे लाईट बिल चुकीच्या पद्धतीने आकारले जाते- मनसेची तक्रार

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती शिवाजीनगर विभागाच्या वतीने सेनापती बापट रोडवरील प्रकाशभवन या महावितरण च्या कार्यालयात ग्राहकांच्या तक्रारीचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या असे निदर्शनास आले आहे की निवासी वापराचे महावितरणचे लाईट बिल प्रत्येकास चुकीच्या पद्धतीने आकारण्यात आले आहे.

तसेच वीज ग्राहकांच्या बिलाच्या रकमेत तफावती जाणवत आहे. चालू मीटर रिडिंग व बिला वरील मीटर रिडिंग यांचा कसलाही ताळमेळ होत नसल्याने वीज ग्राहकांमध्ये महावितरणच्या विरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. महावितरण नवीन जोडणी सिक्युरिटी डिपॉजिटचे (CRA)कोटेशन दिले जाते ते प्रत्येक निवासी ग्राहकांना समान विदुयत भार असतानाही अनेक वीज ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारे जादा दराने मनाला येईल त्या प्रकारे आकारले जात आहे.

वीज मीटरचे रिडींग घेणारे ठेकेदाराचे कामगार मनाला वाटेल तेव्हा कधी पण मीटर रिडींग घेतात तर कधी घेत नाही. त्याचा आर्थिक बोजा वीज ग्राहकांना बसत आहे. अशा अनेक तक्रारींचे निवेदन महावितरणचे मंडल अधिकारी राठोड यांना देण्यात आले. वीज ग्राहकांना योग्य सेवा देणे तसेच त्यांच्या सर्व तक्रारीं लवकरच सोडविण्यात येतील असे आश्वासन मंडल अधिकारी राठोड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिले.

वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे पदाधिकारी नरेंद्र तांबोळी, अनिल राणे, विभागअध्यक्ष विनायक कोतकर,जयश्री मोरे, विशाल पवार, सुनील लोयरे, सुरज कुसाळकर, शंकर पवार अमर आढाळगे, दिव्या गोमासे, मनसैनिक उपस्थित होते.

See also  काँग्रेस भवन येथे लोकसभा निवडणूक जाहीरनामा बनवण्यासाठी बैठक