राज्यपाल,मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

पुणे : पुणे शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सिंचननगर येथे आगमन झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांना पुष्पगुच्छ दिले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुलाब पुष्प देऊन पंतप्रधानांचे स्वागत केले. पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम होणार असून पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

See also  इरशाळवाडी दुर्घटनेतील बचावलेल्या मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे