बालेवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष व कोथरूड मतदार संघ कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत बांधलेला, साई चौक, बालेवाडी येथील भाजी मार्केट सुरू करण्यासंदर्भात आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कोथरूड मतदार संघ कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे, शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर, ज्योती चांदेरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख संतोष तोंडे, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जीवन चाकणकर, महेश सुतार, मधुसूदन पाडाळे, संजय मुरकुटे, नितीन चांदेरे, रितेश पाडाळे, तुषार हगवणे, सारंग कोळेकर, राजेश बालवडकर, पंकज खताने, महेश शिवशरण, आनंद पदीले, रामानंद, विलास पाटील,क्षीरसागर, नितीन वैराल, कृष्णा थिटे, गवाटे तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
स्मार्ट सिटी अंतर्गत बालेवाडी येथील साई चौक येथे बांधण्यात आलेली भाजी मंडई नागरिकांना वापरासाठी अद्याप खुली करण्यात आलेली नाही. सुमारे एक कोटी रुपये खर्च करून भाजी मंडई अद्याप बंदच आहे. भाजी मंडईच्या जागेचा दारू पिण्यासाठी मद्यपींकडून वापर केला जातो. नागरिकांना भाजी मंडईची आवश्यकता असताना देखील बांधलेली भाजी मंडई सुरू का केली जात नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला?
सत्ताधारी महायुतीने पुणे शहराची स्मार्ट सिटी करण्याऐवजी ‘स्क्रॅप सिटी’ केली असल्याचे टीका यावेळी जयेश मुरकुटे यांनी केली.
या आंदोलनात दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच भाजी मंडई मध्ये प्रतिकात्मक भाजी विक्री सुरू करण्यात आली. तसेच परिसरातील पथारी विक्रेते व लायसनधारक भाजी विक्रेत्यांना भाजी मंडईतील गाळे त्वरित वाटप करण्यात यावे तसेच भाजी मंडई सुरू करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.























