कार्यसम्राट माजी आमदार स्व.विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने सहा ऑगस्ट रोजी विनामूल्य आरोग्य शिबिर, पुर्व तपासणी शिबीरात ६० हजार रुग्णांची तपासणी.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची “स्वस्थ ग्राम – स्वस्थ भारत” या संकल्पना सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तसेच गिरीश महाजन यांचे “रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा” हे ब्रीदवाक्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील गरजु व गरीब रुग्णांसाठी केले जाणारे सेवाकार्यसुध्दा समाजासाठी अतिशय मोलाचे आहे.
या पार्श्वभुमीवर गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पुणे मतदारसंघातील गरजु रुग्णांच्या सेवेसाठी कार्यसम्राट माजी आमदार स्व. विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमीत्त सोमेश्वर फॉऊंउेशन, पुणे यांनी दिनांक ०६ ऑगस्ट, २०२३ रोजी “विनामुल्य आरोग्य शिबीर” कृषी महाविद्यालय मैदान- भोसले नगर, शिवाजी नगर, पुणे येथे आयोजित केले आहे.

या शिबीराचा भाग म्हणुन रुग्णांसाठी दिनांक २२ जुलै ते ०४ ऑगस्ट २०२३ पर्यंत रुग्ण पुर्व तपासणी अभियान शिवाजी नगर मतदार संघात (शिवाजीनगर पासून सोमेश्वरवाडी,सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी, इतर) सदर अभियानात एकुण ५७९६३ रुग्णांची पुर्व तपासणी करण्यात आली. व्दितीय रुग्ण तपासणी अभियानात आवश्यक रक्त, लघवी, ईसीजी, एक्स-रे इत्यादी प्रकारची तपासाणी मोफत करण्यात येत आहे.


शिबीराचे उदघाटन
लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार (ता.६). आॕगस्ट रोजी, सकाळी ९ वाजता कृषी महाविद्यालयाचे मैदान, सिंचन नगर, भोसलेनगर, पुणे याठिकाणी कार्यसम्राट मोफत महा – आरोग्य शिबीराचे उदघाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार हे असणार आहेत. प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, शिवसेना उपनेते सचिन अहिर आदी सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित असणार आहेत.

शिबीराचे वैशिष्टे –
• विनामुल्य आरोग्य शिबीरात सर्व पॅथींचा समावेश.
ॲलोपॅथी, आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, युनानी), दंतचिकीत्सा इत्यादी तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया व औषधी विनामुल्य उपलब्ध
• देशातील नामवंत तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती.
डॉ.वाकणकर, डॉ.गौतम भंसाळी, डॉ.रमाकांत देशपांडे, डॉ. के.एच संचेती, डॉ.विकास महात्मे डॉ.संचेती, डॉ.यशराज पाटील, डॉ.ललवाणी, डॉ.चंदनवाले, डॉ.तांबे, डॉ.जगन्नाथ दिक्षीत, डॉ.अमित मायदेव, डॉ.अजय चौरसिया इत्यादी
• विविध आजारांवरील उपचार
एकुण ८० बाह्यरुग्ण कक्षांचा समावेश
सदरील बाह्यरुग्ण कक्षांत आयुष, नेत्रचिकीत्सा, दंतचिकीत्सा, कान नाक घसा, जनरल मेडीसीन, जनरल सर्जरी, हृदयरोग, श्वसनविकार, मुत्ररोग, प्लॉस्टिक सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, अनुंवशीक विकार, कर्करोग, लठ्ठपणा, वृध्द जनरल तपासणी, मतीमंद रुग्ण तपासणी, मनोविकार, मेंदुरोग इत्यादी आजांरावर विनामुल्य औषधोपचार व शस्त्रक्रिया
त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या आवश्यक रक्त व लघवी चाचणी नमुणे संकलन, तसेच इ.सी.जी, मॅमोग्राफी, पी.एफ.टी., बी.एम.डी. तपासणी

See also  लोहियानगर भागातील भगवान मार्कंडे महामुनी पथ या नावाचे नाम फलकाची त्वरित लावावे पुणे शहर पद्मशाली समाजाची मागणी

• गरजु रुग्णांना मोफत वितरण
कृत्रिम अवयव, चष्मे, वृध्दकाठी, अंधकाठी, दिव्यांग साहित्य, कर्णयंत्र, दातांच्या कवळया यांचे नोंदणीनुसार वाटप
• आपतकालीन व्यवस्थेमध्ये कार्डीयाक रुग्णवाहीका, रुग्णवाहीका, अग्निशमन वाहन, रुग्ण स्ट्रेचर, व्हिलचेअर यांचा समावेश
• सर्व रुग्ण व रुग्णनातेवाईक यांना मोफत नास्ता व भोजनाची सोय.
करीता सर्व नागरीकांनी या बहुमुल्य संधीचा लाभ घ्यावा असे आयोजक सोमेश्वर फॉऊंउेशन, पुणे तसेच निमंत्रक माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी आवाहान केले आहे. रुग्णहिताय गरजू नागरिकांनी आधिक माहितीसाठी ८३०८१२३५५५ या नंबरवर संपर्क करावा किंवा www.sunnynimhan.com या वेबसाईटवर नोंदणी करावी.