भाजपच्या वतीने पाषाण येथे विभाजन विभीषीका प्रदर्शनी

पाषाण : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त अमृत काल योजने अंतर्गत विभाजन विभिषिका प्रदर्शनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाषाण येथील सुस रोड साई चौक येथे आयोजित करण्यात आली होती 1947 साली देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या भारत देशाची फाळणी झाली आणि आपल्या देशात जो उद्रेक उसळला त्याच्यातून अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमावा लागला त्यावेळेसच्या परिस्थितीचे आणि त्यावेळेस च्या स्थितीचे दर्शन घडवणारी एक प्रदर्शनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभर आयोजित करण्यात येत आहे.


त्याचाच एक भाग म्हणून आपल्या पाषाण परिसरातील सुस रोड, साई चौक येथे भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल कोकाटे यांच्या माध्यमातून प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेलं होतं पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थितीत प्रदर्शनीला सुरुवात करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र
फेसकॉम संघटनेचे अध्यक्ष अरुण रोडे, पुणे शहर भाजपा सरचिटणीस राजेश येनपुरे, छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे भाजपा अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, ज्येष्ठ भाजप नेते नितीन कोकाटे, रत्नाकर मानकर, दीपक रत्नालीकर, उत्तम जाधव, प्रमोद कांबळे , मयुरी कोकाटे उपस्थित होते.

See also  ‘मन की बात’च्या शतकीय संवादाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !