पतित पावन संघटनेच्या वतीने पुणे मनपा क्रीडा अधिकारी कार्यालय समोर निदर्शने

पुणे : पतित पावन संघटनेच्या वतीने पुणे म.न.पा.क्रीडा अधिकारी , नेहरू स्टेडियम येथील कार्यालयाच्या समोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

गेल्या ८ वर्षात आपल्या पुणे शहरातील विविध भागात असलेल्या क्रीडांगण, क्रिडा संकुल साठी पुणेकरांच्या पैशातून जवळ पास ३४कोटी ५४ लाख ५० हजार रुपयांची धूळधाण झाली आहे. हि सर्व मैदाने क्रिडा संकुले जवळ पास बंद तसेच या ठिकाणी कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य, खेळाडूंना सरावा साठी अपुऱ्या सुविधा, स्वच्छता गृहाची वाट व यात भरीत भर म्हणून दारूच्या बाटल्यांचा ढीगारांच्या खच सापडले आहेत. या सर्वाला कारणीभूत अधिकारी ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. यासाठी आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, मनोज नायर, गोकुळ शेलार, पप्पु टेमघरे, मनोज पवार, अरविंद परदेशी, निलेश जोशी, विजय गावडे,राजाभाऊ बर्गे, शरद देशमुख, ज्ञानेश्वर साठे, हराले पाटील ,तेजस पाबळे , राहूल पडवळ, अण्णा बांगर,शंकर बरके, अक्षय बर्गे, शुभम परदेशी , सौरभ पवार, प्रकाश भुवड,शंकर गिरकर, शशिकांत तोडकर, मनोज शिंदे दीपक परदेशी आदि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  सिंहगडावर अतिक्रमण कारवाई; वार्तांकनासाठी पत्रकारांना सिंहगडावर  मनाई, आपत्ती व्यवस्थापनासाठी संयुक्त पाहणी करणार असल्याची वन विभागाची माहिती