बाणेर येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जीवन चाकणकर यांनी भारताने ‘चंद्रयान 3’ मोहीम यशस्वी केल्याचा आनंद केला साजरा

बाणेर : बाणेर – बालेवाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आज भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा ‘चंद्रयान 3’ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल सर्व शास्त्रज्ञांचे व कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन तसेच शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. बाणेर बालेवाडी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जीवन चाकणकर(उपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल पुणे) यांनी फटाके वाजवले तसेच परिसरात पेढे मिठाईवाटून आनंद साजरा करण्यात आला.


ओबीसी सेलचे काँग्रेस उपाध्यक्ष जीवन चाकणकर म्हणाले, आपल्या भारताची चंद्रावर स्वारी करण्याची मोहिम अखेर फत्ते झाली. चांद्रयान ३ नं इतिहास रचला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. ही आपल्या सर्वांसाठीच अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

See also  बाणेर मध्ये 'ग्रे स्टोन' इमारतीच्या बांधकामावरील क्रेन घरावर पडून अपघात