ताथवडे येथील ऑस्टिन पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सोलर पॅनल प्रोजेक्टचे खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते लोकार्पण

ताथवडे : ताथवडे मुळशी येथील ऑस्टिन पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला भेट देऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सोसायटीच्या सोलार पॅनल प्रोजेक्ट् चे लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी सोसायटीचे पदाधिकारी, नागरिक, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक मयूर कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ताथवडे परिसरातील विविध सामाजिक प्रश्नांची माहिती खा.सुप्रिया सुळे यांनी घेतली. तसेच राष्ट्रीय महामार्ग संदर्भात असलेले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

See also  स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील लाभार्थ्यांना सदनिका हस्तांतरण