14 सप्टेंबर रोजी औंध बाणेर बालेवाडी बोपोडी पाषाण महाळुंगे परिसरात मराठा समाजाचे बंदचे आवाहन; पुणे शहरातही बंद ठेवण्याचे मराठा बांधवांचे आवाहन

पुणे : सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा औंध ,बाणेर, बालेवाडी, बोपोडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महाळुंगे येथे मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी बंद जाहीर करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यामध्ये अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा व पोलीस बाळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले आहे.



गुरुवार दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी औंध, बाणेर,बालेवाडी, बोपोडी पाषाण, सुतारवाडी,सोमेश्वर वाडी सुस, महाळुंगे परिसरामध्ये बंद पाळण्यात येणार आहे. बंदच्या दिवशी सकाळी 10 वा. राजमाता चौक औंध येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात येणार असून बालेवाडी फाटा येथे एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे.

औंधगाव व्यापारी असोसिएशनच्या वतीने बंदला जाहीर पाठिंबा देण्यात आला असून विविध सामाजिक व सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे.

बंदच्या नियोजना संदर्भामध्ये व बंद दरम्यान कायदा सुव्यवस्थेचे पालन व्हावे यासाठी विविध ठिकाणी मराठा समाजाच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

औंध बाणेर बालेवाडी बोपोडी पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी महाळुंगे परिसरातील व्यापारी संघटना, शाळा महाविद्यालये, हॉटेल, खाजगी कंपन्या, मॉल बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

See also  खडकवासल्यात  उमेदवारी बाबत महाविकास आघाडीत नाराजी, इच्छुक अपक्ष लढण्याच्या तयारीत