औंध गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

औंध : औंधगाव येथे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ जयंती एक गाव एक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

तीन दिवस चाललेल्या या उत्साहात पहिल्या दिवशी दिनांक १५ मार्च ला युवा व्याख्याते श्री. सुदर्शन शिंदे यांचे शिव – शंभु विचाराचे व्याख्यान ठेवण्यात आले, तर दुसऱ्या दिवशी दिनांक १६ मार्च ला भव्य असे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आली होती त्यात गावातील शिवभक्तानी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. आणि तिसऱ्या दिवशी दिनांक १७ मार्च ला छत्रपती शिवाजी महाराजची पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये मिरवणूक ची सुरुवात उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती तसेच महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये मर्दानी खेळ, ढोलताशांचा गजर, फटाक्याची आतषबाजी, जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.

तसेच मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा यांने मिरवणूक ची शोभा वाढवली होती तसेच मिरवणूक ची सांगता महाशिववंदनेने करण्यात आली. या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन समस्त औंधगाव ग्रामस्थांनी केले होते.

See also  कर्वेनगर येथील भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूल मध्ये अतिरिक्त आयुक्त ओम प्रकाश दिवटे यांनी केले शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत