32 व्या अखिल भारतीय जी.व्ही. मावळणकर शॉर्टगन शूटिंग स्पर्धेत रोशनी शेख, स्मिता सावंत यांची सुवर्ण पदकाची कमाई

पुणे : 32 व्या अखिल भारतीय जी.व्ही. मावळंकर शॉर्टगन शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये रोशनी सिराज शेख हिने ज्युनियर महिला गटात सुवर्णपदक आणि महिला गटात सुवर्णपदकाची तर नरेंद्र इंद्रमण सिंग याने रौप्यपदक जिंकले.

डबल ट्रॅप स्पर्धेत स्मिता सावंत हिने दोन सुवर्णपदक तर रोशनी सिराज शेख हिने दोन रौप्य पदक व विवेक सावंत यांनी एक कांस्यपदक जिंकले.

बालेवाडी येथे हे नेमबाज हेमंत बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. विजेत्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.

See also  सुस येथील अकिंता जगताप (काळे) यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा २०२४ पुरस्कार नुकताच जाहीर