आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे शहरात गंज पेठेत स्वच्छता अभियान

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक ( गंज पेठ ) परिसरात मध्ये पुणे शहर अध्यक्ष श्री सुदर्शन जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली स्वछता मोहीम राबवण्यात आली.

सदरील ठिकाणी दोन ट्रक भरून राडारोडा, ओला आणि सुका कचरा निघाला तसेच आम आदमी पार्टीच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या(23फेब्रुवारी )जयंतीचे औचित्यने पुढील वर्षभर दर महिन्याच्या प्रत्येक 23 तारखेला विविध प्रभागात स्वच्छ्ता मोहीम आम आदमी पार्टीच्या वतीने राबवण्यात येईल अशी घोषणा सुदर्शन जगदाळे यांनी केली.

यावेळी किरण कांबळे, शेखर ढगे ,अजय पैठणकर ,अमोल मोरे, सतीश यादव ,गणेश जाधव, मुकुंद किर्दत ,शिवाजी डोलारे, अली सय्यद, गुणाजी मोरे ,अविनाश भाकरे ,ज्ञानेश्वर गायकवाड ,अनिल कोंढाळकर, सुनील भोसले ,प्रशांत कांबळे,संजय बागव ,विकास लोंढे,बेनकर,अनिस, बापू रणसिंग, उत्तम वडवराव,विवेक गोसावी, कुमार धोंगडे ,रामभाऊ इंगळे, संजय नवरे ,मंजुनाथ मणुरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

See also  छत्रपती शिवाजीनगर मतदार संघात ऐतिहासिक विजयाचा शिरोळे यांना विश्वास