बाणेर पोस्ट ऑफिसमध्ये जागतिक टपाल दिन साजरा

बाणेर : आजकाल तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजीमध्ये अनेक बदल झाले आहेत. मोबाईल आणि इंटरनेटमुळे तर माहितीचे जाळे अधिकच विस्तारले आहे. हे सर्व बदल मागील काही वर्षांमध्ये वेगाने झाले आहेत. परंतु, पूर्वीच्या काळी एकमेकांची ख्यालीखुशाली कळवण्यासाठी, निरोप पाठवण्यासाठी काही सरकारी कामांसाठी, नोकरीसाठी इत्यादी अनेक कामांसाठी टपालसेवेचा आधार घेतला जात होता. आज या जागतिक तपाल दिनानिमित्त बाणेर येथील अहिल्या आणि सावित्री महिला बचत गटातील महिलांनी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अधिकारी वर्गापासून ते कर्मचारी वर्गाना गुलाब फुल देऊन जागतिक तपाल दिन साजरा केला.


यावेळी बाणेर येथील अहिल्या गटातील अध्यक्षा साजना भुजबळ, कविता पोळ,अनिता सूर्यवंशी, पार्वती सूर्यवंशी, इंदू कांबळे, रेखा मातंग, वंदना वडतीले ,अनिता शिंदे ,कविता सायकर, शुभांगी सायकर् तर सावित्री गटातील शायदा पठाण,मनीषा, वर्षा हंबीरराव, सविता जगताप,नेहा साळवे, मनीषा पुजारी,मीना भांडवलकर, मीनाक्षी शिंदे, वैशाली कांबळे,शितल कळमकर, रूपाली सायकर, हेमाली लोणकर आदी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
पूर्वी अनेक कामे करण्यासाठी पत्रे लिहिली जात होती. तार पाठवल्या होत्या. आता मात्र, तारसेवा बंद झाली आहे. मात्र, टपालसेवा आणि पत्रांचे महत्व आजही कायम आहे. या फायजी च्या काळात आज ही टपालसेवेचे महत्व अबाधित आहे.
यावेळी टपाल सेवा आणि त्यातील विभागांविषयी लोकांना माहिती देणे, आणि विविध सेवांविषयी लोकांना जागरूक करण्यात आले.

See also  आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेच्यावतीने 'निर्मलवारी' उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी