गजानन रबर स्टॅम्प कंपनीचे मालक गजानन ऊर्फ बापू चंद्रकांत महाजन यांचे निधन

खो- खो खेळाडू दीपा महाजन- भडंगे‌ यांना पितृशोक
पुणे – आप्पा बळवंत चौकातील जुन्या काळातील‌ गजानन रबर स्टॅम्प कंपनीचे मालक गजानन ऊर्फ बापू चंद्रकांत महाजन (वय ७४, रा.शनिवार पेठ, सध्या रा.वारजे)यांचे निधन झाले आहे.


खो-खो खेळातील खेळाडू व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती दीपा महाजन- भडंगे‌ यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे मुलगी दीपा, मुलगा, भाऊ, भावजय, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार झाले.
आप्पा बळवंत चौकातील जुन्या काळातील गजानन रबर स्टॅम्प कंपनीचे ते मालक होते. बँक ऑफ बडोदाचे निवृत्त व्यवस्थापक रमेश महाजन व गजानन रबर स्टॅम्प कंपनीचे मालक वसंत महाजन यांचे ते भाऊ होते. वेरिटास टेक्नॉलॉजीस कंपनीचे वरिष्ठ अभियंता व्यवस्थापक राहुल महाजन हा त्यांचा मुलगा होत. मराठी पत्रकार परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष व सासवडचे माजी नगरसेवक मनोज मांढरे हे त्यांचे भाचे होत.

See also  सुरक्षित वाहतूकीसाठी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे- पोलीस आयुक्त रितेश कुमार