६५ वा महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे

धाराशिव : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित ६५ वा महाराष्ट्र केसरी किताबाच्या मुख्य लढतीसाठी मूळचा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील मात्र नांदेडचे प्रतिनिधी करणाऱ्या शिवराज राक्षे याने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याचा ६-० अशा गुणाधिक्याने पराभव करत महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले.


या मुख्य लढतीला सायंकाळी साडेसात वाजता मान्यवरांच्या हस्ते सुरुवात झाली. पहिल्या फेरीला दोन्ही मल्लांनी आक्रमक सुरूवात केली. शिवराजने हर्षवर्धनचा एकेरीपट काढण्याचा प्रयत्न केला होता. तो हर्षवर्धनने हाणून पाडला. त्यातच शिवराजने हर्षवर्धनला बाहेर ढकलून एका गुणाने आपले खाते उघडले. त्यानंतर हर्षवर्धन डावाच्या पकडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असल्याने पंचाने अर्धा मिनिटांत गुण घेण्याची ताकीद दिली. मात्र हर्षवर्धन गुण घेण्यात अपयशी ठरल्याने शिवराजला एक गुण मिळाला. शिवराजने पहिल्या फेरीत २-० अशी आघाडी घेतली. पुन्हा दुसऱ्या फेरीला आक्रमक सुरूवात झाली. यावेळी आक्रमक लढतीत हर्षवर्धनच्या हाताला दुखापत झाल्याने मेडिकल उपचारासाठी वैद्यकीय वेळेनुसार कुस्ती थांबविण्यात आली.

पुन्हा कुस्तीला सुरुवात झाली. हर्षवर्धनने डाक मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो शिवराजने हाणून पाडत दोनदा हर्षवर्धनला बाहेर ढकलून एक एक गुणांची कमाई केली. पुन्हा एकदा ताबा घेत दोन गुणांची कमाई करत शिवराजने हि लढत ६-० अशा गुणाधिक्याने जिंकत मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले.

See also  नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट