समाजभूषण शांताराम महाराज निम्हण यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गौरव ग्रंथ प्रकाशन व विविध कार्यक्रमांचे आयोजन

पाषाण : पाषाण मधील वारकरी संप्रदायामध्ये समाजभूषण शांताराम महाराज निम्हण यांच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून 11 फेब्रुवारी, 2024 रोजी ‘सभाव भजन’ गौरव ग्रंथाचे प्रकाशन तसेच “समाजभूषण ह.भ.प. शांताराम सयाजीबुवा निम्हण ट्रस्ट” चे समाजाप्रती अर्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार नानासाहेब नवले, संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचे वंशज केशव महाराज नामदास, संत सोपानदेव समाधी संस्थानचे विश्वस्त गोपाळ गोविंद गोसावी, बंडातात्या कराडकर, बाळासाहेब देहूकर, उल्हासदादा पवार, प्रमोद जगताप आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानदीप मंगल कार्यालय पाषाण येथे दिनांक 11 फेब्रुवारी, 2024 रोजी सायंकाळी ६ वाजता पाषाण सोमेश्वरवाडी सुतारवाडी समस्त भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त काँग्रेस भवन येथे भावपूर्ण आदरांजली अर्पण