कोथरूड : कोथरूड मधील नागरिकांना रॅलीमुळे वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार एडवोकेट किशोर शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह मेट्रोतून प्रवास करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार एडवोकेट किशोर नाना शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस हेमंत संभूस, सरचिटणीस गणेश सातपुते, सरचिटणीस अजय शिंदे, पुणे शहर सचिव रामभाऊ बोरकर, माजी नगरसेविका पुष्पाताई कनोजिया,माजी नगरसेविका सुरेखाताई मकवान,प्रशांत कनोजिया,अमोल शिंदे,राजेंद्र वेडे पाटील, गणेश शिंदे, संजय काळे सचिन विप्र इत्यादी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
यावेळी किशोर शिंदे म्हणाले, कोथरूड मध्ये सध्या शाळांच्या परीक्षा सुरू आहेत. रॅलीमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला असा त्रास नागरिकांना होऊ नये म्हणून मेट्रोतून प्रवास करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कोथरूड मध्ये रॅली काढून सर्व सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे काम करण्यात आले. यामुळे नोकरदार वर्ग व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना त्रास सहन करावा लागला. रॅली काढण्यासाठी पिंपरी चिंचवड परिसरातून माणसे बोलवण्यात आली होती. यासाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना माणसे गोळा करण्याचे टार्गेट देण्यात आले होते. अशा जनसामान्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या यामुळे मेट्रो ने प्रवास करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असे किशोर शिंदे यांनी सांगितले.