पुणे : स्मार्ट सिटी नावाखाली करोडो रुपयांचा घोटाळा भाजपा ने केला आहे. एक हजार कोटी खर्च करूनही जनतेच्या अपेक्षा चे एकही काम पूर्ण नाही. भाजी मंडई च्या नावाखाली कोटावधी रुपये खर्च करायचे आणि त्या बंद ठेऊन आठवडी बाजार चालू करायचे. जनतेची लूट टॅक्स मधून सरकार करते आणि आठवडी बाजाराच्या नावाखाली भाजी विक्रेत्या कडून कोट्यवधी रुपये पालिका अधिकारी आणि नगरसेवक वसूल करतात. ही जनतेची दुहेरी लूट आहे.
हजारो कोटी चे टॅक्स जमाकरूनही, १० ते १२ हजार रुपये चौरस फूट भावाने फ्लॅट विकत घेतले पण बालेवाडी मधील जनतेला मूलभूत सुविधा मिळत नाहीत.
ऊन वारा पाऊस उभा राहून नागरिकांना भाजी विकत घ्यावी लागते, चौका चौकात आठवडी बाजारामुळे ट्रॅफिक जॅम होतात. या भागातील नागरिकांना मध्ये बहुतांशी नवरा बायको दोघेही नोकरी करतात विकत आणि ताजी भाजी त्यांच्या वेळेनुसार उपलब्ध करू देणे प्रशासनाचे काम आहे. भाजी विक्रेत्याला पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून त्रास दिला जातो. या सर्वासाठी उपाय म्हणजे स्थायी स्वरूपाची भाजी मंडई ही अत्यावश्यक गरज झाली आहे.
पुणे शहरामध्ये आठवडी बाजारचा खूप मोठे पेव फुटले आहे. आठवडी बाजाराच्या माध्यमातून खूप मोठा घोटाळा पुणे महानगरपालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक संगनमताने करत आहेत.
आम आदमी पार्टी चा पुणे महापालिकेला इशारा आहे की येत्या शुक्रवार पर्यंत भाजी मंडई चालू केली नाहीतर येत्या रविवारी आम्ही विक्रेत्यांना मध्ये बसवून भाजी विका याला देऊ.
यावेळी पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, रोशन शहारे, रितेश निकाळजे, नितीन पायगुडे, विक्रम गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, मनोज येरंडकर, अनिश वर्गीस, हरिश चौधरी, रविराज काळे, ऋषिकेश कानवटे, निलेश दुशिया, सलीम शेख, प्रथमेश येरंडकर आदी उपस्थित होते.
टॅक्स च्या पैशातून भाजी मंडई बांधकाम करायच्या आणि त्या बंद करून आठवडी बाजार चालू करायचे. प्रत्येक माजी नगरसेवकांच्या किमान २-३ आठवडी बाजार चालू असतात. आठवडी बाजार मधील प्रत्येक विक्रेत्याकडून ५००-६०० रुपये प्रतिदिन नगरसेवक आणि पालिका अधिकारी घेतात. खूप मोठा भ्रष्टाचार आम आदमी पार्टी पत्रकार परिषद घेऊन उघड करणार आणि शहरातील सगळ्या बंद पडलेल्या मंडई चालू करणार.
– सुदर्शन जगदाळे, पुणे शहर अध्यक्ष आप