नमो चषक जिल्हास्तरीय शिवकालीन युद्धकला ( सिलंबम ) स्पर्धा संपन्न

पुणे : ना. चंद्रकांतदादा पाटील आयोजित नमो चषक शिवकालीन युद्ध कला ( सिलंबम ) स्पर्धा उत्साहात आणि 900 ( नऊ शे ) स्पर्धकांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडल्याचे स्पर्धा संयोजक व भाजयुमो क्रीडा आघाडीचे पुणे शहर प्रमुख प्रतीक खर्डेकर यांनी सांगितले.
मुलांना क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन ह्या खेळांचे आकर्षण आहे पण त्याचबरोबर आपल्या मातीतील खेळ ही त्यांनी खेळले पाहिजेत यासाठी अश्या स्पर्धाचे आयोजन केले असल्याचे ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या संदेशात म्हंटले आहे.ह्या कला मुलांचे शारीरिक आणि मानसिक बल वाढविण्यासाठी उपयुक्त असल्याचे ही ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. विविध शाळांमध्ये विशेषतः विद्यार्थिनींना ही कला शिकविण्याच्या प्रस्तावावर त्यांनी आपल्या संदेशात सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे प्रतीक खर्डेकर म्हणाले.


शिवकालीन युद्धकलेत लाठी काठी, दांडपट्टा, भाला, तलवारबाजी इ कलाप्रकारांचा समावेश असल्याचे “सिलंबम असोसिएशन पुणे” चे सरचिटणीस श्री.कुंडलिक कचाले व कार्याध्यक्ष योगेश कंठाळे यांनी सांगितले. स्पर्धेचे उदघाट्न भाजयुमोचे शहर अध्यक्ष करण मिसाळ,भाजपा चे कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला,सरचिटणीस मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरूड मंडल सरचिटणीस विठ्ठल बराटे,अनुराधा एडके, गिरीश खत्री,दीपक पवार,माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील,जयंत भावे,नवनाथ जाधव, गिरीश भेलके,अमोल डांगे, राज तांबोळी,कुणाल तोंडे, सागर भोसले इ मान्यवर उपस्थित होते.
दिवसभर रंगलेल्या स्पर्धेत पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने आणि खेळ भावना जपत भाग घेतला.
स्पर्धेचे सांघिक निकाल खालीलप्रमाणे…
स्पर्धेचे सांघिक निकाल खालीलप्रमाणे…
1.. मुलांमध्ये प्रथम क्रमांक डी .ई. एस. स्कुल टिळक रोड.
2 .मुलांमध्ये द्वितीय क्रमांक वनाज परिवार विद्यामंदिर कोथरूड.
3.. मुलांमध्ये तृतीय क्रमांक पंडितराव आगाशे स्कूल लॉ कॉलेज रोड

1… मुलींमध्ये प्रथम क्रमांक स्काऊट ग्राउंड  सिलंबम पुणे मुख्य प्रशिक्षण केंद्र सदाशिव पेठ.
2… मुलींमध्ये द्वितीय क्रमांक ‌माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालय टिळक रोड.
3…. मुलींमध्ये तृतीय क्रमांक ज्ञानसाधना विद्यामंदिर वडगाव( बुद्रुक).
19 वर्षावरील मुलांच्या खुल्या स्पर्धेत प्रणिस गायकवाड याने प्रथम क्रमांक, शक्तीप्रसाद पात्रा याने द्वितीय क्रमांक तर ओम संगपुल्लम याने तृतीय क्रमांक मिळविला. तर 19 वर्षावरील मुलींच्या खुल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक समृद्धी चिल्लाळ, द्वितीय क्रमांक संतोषी कोत्तावार,तृतीय क्रमांक स्नेहा चौधरी यांनी मिळविला.
14 ते 17 वयोगटात मुलांमध्ये प्रथम क्रमांक शंतनू उभे, द्वितीय क्रमांक सोमेश्वर बरडे  आणि तृतीय क्रमांक प्रणव पांढरे यांनी मिळविला. तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक प्रतीक्षा कांबळे, द्वितीय क्रमांक अवंती सकुंडे आणि तृतीय क्रमांक अवंती निजामपूरकर यांनी मिळविला.
14 वर्षाखालील वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवम पोटे,द्वितीय क्रमांक विहान निकम तर तृतीय क्रमांक वेदांत अंकले यांनी मिळविला तर मुलींच्या स्पर्धेत पहिला क्रमांक ईश्वरी भोकरे,द्वितीय क्रमांक सई साळुंके तर तृतीय क्रमांक प्रांजल कापसे यांनी मिळविला.

पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून शहर उपाध्यक्ष शाम देशपांडे, कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला,प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर,माजी नगरसेवक दीपक पोटे, मंडल सरचिटणीस व महिला मोर्चा प्रभारी मंजुश्री खर्डेकर,दिनेश माथवड,माजी नगरसेविका वासंती जाधव,नवनाथ जाधव,कामगार आघाडी राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब टेमकर,महिला आघाडी अध्यक्ष कांचन कुंबरे, सरचिटणीस सौ.विद्या टेमकर,युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश सरनौबत,महिला मोर्चा उपाध्यक्ष कल्याणी खर्डेकर,समीर गाडगीळ,रुपेश कुंबरे,यश काळभोर इ मान्यवर उपस्थित होते.प्रतीक खर्डेकर यांनी स्पर्धा संयोजन व सूत्रसंचालन केले तर कुंडलिक कचाले व योगेश कंठाळे यांनी संयोजनात सहभाग घेतला.

See also  मेट्रो पुणेकरांच्या सोयीसाठी की, भाजपच्या राजकीय फायद्यासाठी -माजी आमदार मोहन जोशी