छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मुलांना शिवचरित्र पुस्तक वाटप

बाणेर : पुणे जिल्ह्यातील बाणेर गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित अहिल्या बचत गटांनी लहान मुलांना शिवचरित्र पुस्तक देऊन जयंती साजरी करण्यात आली.


बाणेर गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे  अहिल्या बचत गटांतील महिलांनी महाराजांना अभिवादन केले. तसेच  छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने  ग्राहक रक्षक समिती पुणे शहर प्रवक्ता , अहिल्या गटाच्या अध्यक्षा साजना  दिलिप भुजबळ यांनी लहान मुलांना शिवाजी महाराजांचे पुस्तके याचे वाटप करण्यात आले. यावेळी सावित्री गटाच्या अध्यक्ष कोमल लोणकर तसेच  अहील्या  गटाचे सचिव पार्वती सूर्यवंशी  अनिता सूर्यवंशी इंदू कांबळे रेखा मातंग जोत्सना गटाच्या सदस्य उपस्थित होते तसं बालकलाकार पण उपस्थित होत तसेच यावेळी प्रीती सूर्यवंशी यांनी महाराजांना मुजरा करून शिवगर्जना केली.

See also  पदाधिकाऱ्यांना तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी लावून घरोघरी संपर्काच्या सूचना