बिबवेवाडी : बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे उपआयुक्त प्रदिप आव्हाड यांनि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 28 व एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गुलटेकडी औधोगिक वसाहत व इंदिरानगर खड्डा वस्ती भागातील व प्रभागातील अनेक समस्या बाबत लेखी तक्रार निवेदन देऊन वस्ती भागातील कार्यकर्तांना सोबत घेत अनेक समस्याचे लेखी निवेदन दिले.
यामध्ये प्रमुख्याने खचलेले चेंबर , (कॉक्ररेट) गल्लीतील रस्ता दुरूस्ती,कचरा प्रश्न, कमी दाबाने पाणी पुरवठा अवेळी पाणी पुरवढा, अस्वच्छ सार्वजनिक सौचालय,व वस्ती भागातील CCtv कॅमेरे व मोहल्ला कमेंटी बैठक पुर्वी प्रमाणे सुरू करण्याबाबत
निवेदन दिले. आव्हाड यांनी काही दिवसात सर्व विभागांन सोबत घेत प्रभागातील समस्या दूर करू असे कळवले व नवीन मल वाहीनी व ड्रेनेज समस्या वर लवकरच त्वरीत तोडगा काढु व सर्व तक्रारी सोडुन देण्याचे तोंडी आश्वासन दिले.
यावेळी गणेश शेरला यांच्या वतीने शहनवाज पिंजारी, सुनिल शेवरे, गणेश खरटमल,हेमंत जगताप व अक्षय गायकवाड उपस्थित होते.